मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

२ मार्च चा इतिहास

जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक २ मार्च चा इतिहास पहा.
२ मार्च दिनविशेष | 2 March Dinvishesh
डॉ. काशिनाथ घाणेकर
डॉ. काशिनाथ घाणेकर - (१४ सप्टेंबर १९३० - २ मार्च १९८६) डॉ. काशीनाथ घाणेकर यांचे मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सृष्टीत अतुलनीय योगदान होते. मराठीशिवाय त्यांनी ‘अभिलाशा’ सारख्या हिंदी चित्रपटांत देखील उत्तम अभिनय केला आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर हे व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या ‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकातील संभाजी महाराजाच्या भूमिकेने ते एक लोकप्रिय अभिनेते झाले. येथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, मधुमंजरी इत्यादी नाटकात त्यांनी अभिनय केले.

जागतिक दिवस

२ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • स्वांतत्र्य दिन: मोरोक्को.
  • स्वांतत्र्य दिन: टेक्सास.

ठळक घटना (घडामोडी)

२ मार्च रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १६६०: पन्हाळगड किल्ल्यास सिद्धी जौहरचा वेढा पडला.
  • १७९१: पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथमतः प्रात्यक्षिक.
  • १८३६: टेक्सासच्या प्रजासत्ताकने स्वतःला मेक्सिको पासून स्वतंत्र जाहीर केले.
  • १८४४: विरेश्वर छत्रे यांनी ‘मित्रोदय’ पत्र सुरु केले
  • १८५५: अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी.
  • १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
  • १८६१: झार अलेक्झांडर दुसऱ्याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
  • १८७७: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सॅम्युएल जे. टिल्डनला मताधिक्य असूनही अमेरिकन काँग्रेसने रदरफोर्ड बी. हेसला अध्यक्षपदी बसवले.
  • १९१७: रशियात झार निकोलस दुसऱ्याने पदत्याग केला. त्याचा भाउ मायकेल झारपदी.
  • १९३९: पायस बारावा पोपपदी.
  • १९४३: दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.
  • १९४६: हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.
  • १९४९: कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • १९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
  • १९५५: कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.
  • १९५६: मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६२: म्यानमारमध्ये लश्करी उठाव.
  • १९६९: फ्रांसच्या तुलु शहरात स्वनातीत प्रवासी विमान काँकोर्डची पहिली चाचणी.
  • १९७०: ऱ्होडेशिया प्रजासत्ताक झाले.
  • १९८३: आसामचे ७ जिल्हे अशांत टापू म्हणून भारत सरकारने जाहीर केले
  • १८८८: कॉन्स्टँटिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
  • १९९१: तामिळ वाघांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार
  • १९९१: पहिले अखाती युद्ध - रमैलाची लढाई.
  • १९९२: उझबेकिस्तान व मोल्डाव्हियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
  • १९९५: बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात निक लीसमला अटक.
  • १९९६: जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
  • १९९८: गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपवर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
  • २००१: अफगाणिस्तानातील बामियान शहराजवळील सुमारे ६,००० प्राचीन बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरुवात केली.
  • २००४: इराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
  • २००४: संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती.
  • २००६: पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
  • २००६: नवी दिल्लीत भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक परमाणु करार संपन्न झाला

जन्म (वाढदिवस, जयंती)

२ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १३१६: रॉबर्ट दुसरा (स्कॉटलंडचा राजा, मृत्यू: ).
  • १४५९: पोप एड्रियान सहावा (मृत्यू: ).
  • १७४२: विश्वासराव पेशवे (नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, मृत्यू: ).
  • १७९३: सॅम ह्युस्टन (टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ).
  • १८१०: पोप लिओ तेरावा (मृत्यू: ).
  • १८५५: एडमुंड पीट (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १८७६: पोप पायस बारावा (मृत्यू: ).
  • १९१२: चुड लॅंग्टन (दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९२३: डॉन टेलर (न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९२५: शांता जोग (चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री, मृत्यू: ).
  • १९३१: राम शेवाळकर (मराठी साहित्यिक, मृत्यू: ).
  • १९३१: मिखाईल गोर्बाचेव्ह (सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ).
  • १९३२: बसंत सिंह खालसा (राजनीतिज्ञ, मृत्यू: ).
  • १९३७: अब्देलअझीझ बुटेफ्लिका (अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ).
  • १९५७: स्टु गिलेस्पी (न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९६२: जॉन बॉन जोव्ही (अमेरिकन रॉक संगीतकार, मृत्यू: ).
  • १९७७: अँड्रु स्ट्रॉस (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९७९: दर्शना गमागे (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९७९: जिम ट्राउटन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९७९: मार्क व्हर्मुलेन (झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९८६: जयंत तालुकदार (भारतीय तीरंदाज खेळाडू, मृत्यू: ).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ८५५: लोथार, पवित्र रोमन सम्राट (जन्म: ).
  • १५६८: मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई (कृष्णभक्त, जन्म: ).
  • १७००: राजाराम महाराज (मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, जन्म: ).
  • १७३०: पोप बेनेडिक्ट तेरावा (जन्म: ).
  • १७९१: जॉन वेस्ली (मेथोडिस्ट चर्चचा स्थापक, जन्म: ).
  • १८३५: फ्रांसिस दुसरा (पवित्र रोमन सम्राट, जन्म: ).
  • १९२१: निकोलस पहिला (मॉंटेनिग्रोचे राजे, जन्म: ).
  • १९३०: डी.एच. लॉरेन्स (इंग्लिश लेखक, जन्म: ).
  • १९४९: सरोजिनी नायडू (प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी, जन्म: ).
  • १९८६: डॉ. काशीनाथ घाणेकर (मराठी चित्रपट अभिनेते, जन्म: १४ सप्टेंबर १९३०).
  • १९९४: पं. श्रीपादशास्त्री जेरे (धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न, जन्म: ).
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.