मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

बिकट वाट वहिवाट - मराठी कविता (अनंत फंदी)

प्रसिद्ध मराठी कवी अनंत फंदी यांची बिकट वाट वहिवाट ही मराठी कविता.
बिकट वाट वहिवाट - मराठी कविता (अनंत फंदी)
बिकट वाट वहिवाट - मराठी कविता (अनंत फंदी)

बिकट वाट वहिवाट

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐसा आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनी निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तिकपणि तू शिरुनी जनाचा, बोल आपणा घेऊ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेपुढती पाहु नको
मायबापावर रुसू नको
दुर्मुखलेला असू नको
व्यवहारामंधी फसू नको
कधी रिकामा बसू नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करु नको

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसर्‍याचा ठेवा, करुनी हेवा, झटू नको
मी मोठा शहाणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहु नको
एकाहुनी चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गोरगरीबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपेश माथा घेउ नको
उणी तराजू तोलू नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तू मागु नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहु नको

उगीच निंदा स्तुती कुणाची, स्वहितासाठी करु नको
बरी खुशामत शाहण्याची, परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजी-भाकरी, तूपसाखरे चोरु नको
दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख, कधि विटू नको
असल्या गाठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नको
आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तू टाकू नको
सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरु नको
द्वैताला अनुसरु नको
हरिभजना विस्मरु नको
सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको

- अनंत फंदी

संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.