मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

१ मार्च चा इतिहास

जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १ मार्च चा इतिहास पहा.
१ मार्च चा इतिहास | March 1 in History
वसंतराव दादा पाटील - माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य (छायाचित्र सौजन्य: अखिल भारतीय काँग्रेस)
वसंतराव दादा पाटील - (१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी.

जागतिक दिवस

१ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • स्वांतत्र्य आंदोलन दिन: दक्षिण कोरिया.
  • जागतिक संरक्षण दिन.

ठळक घटना (घडामोडी)

१ मार्च रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १५६२: फ्रांसमधील वासी शहरात कॅथोलिक जमावाने १,०००हून अधिक हुगेनो व्यक्तिंना मारले.
  • १५६५: ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
  • १६४०: ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी केंद्र सुरु केले.
  • १८६९: रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी ‘जगदहितेच्छु’ नावाचे पत्र सुरु केले शिवरामपंत परांजपे यांचे 'काळ' पत्र सुरुवातीला जगदहितेच्छूच्या छापखान्यात छापले जायचे
  • १८७२: यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
  • १८७३: ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरूवात केली.
  • १८९६: आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
  • १९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
  • १९१२: आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
  • १९२७: रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.
  • १९३६: हूवर धरणाचे बांधकाम समाप्त.
  • १९४७: आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या कामकाजास सुरुवात झाली.
  • १९४८: गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
  • १९६९: नवी दिल्ली व कलकत्त्यामध्ये धावणारी पहिली सुपरफास्ट रेल्वेगाडी ‘राजधानी एक्सप्रेस’ सुरु झाली.
  • १९७८: स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
  • १९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
  • १९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
  • १९९९: भूसुरुंगावर बंदी घालणारा करार १३३ देशांच्या संमतीने कार्यरत
  • २००१: भारताच्या लोकसंख्येने १०० कोटीची पायरी ओलांडली. ह्या बाबतीत भारत हा चीननंतर दुसरा देश ठरला
  • २०१९: पाकिस्तानी वायुदलाच्या भारतीय हद्दीत घुसलेल्या विमानांना पिटाळून लावताना पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान ३ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतले.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८१०: फ्रेडरिक चॉपिन (पोलिश संगीतकार, मृत्यू: ).
  • १८८८: इवार्ट ऍस्टील (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९१०: डेव्हिड निवेन (इंग्लिश अभिनेता, मृत्यू: ).
  • १९१४: भानुदास श्रीधर परांजपे (कथाकार, समीक्षक, मृत्यू: ).
  • १९१७: करतार सिंह दुग्गल (पंजाबी, हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये लिहिणारे प्रसिद्ध साहित्यकारक, मृत्यू: ).
  • १९१८: होआव गुलार्ट (ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: ).
  • १९२२: यित्झाक राबिन (इस्रायेलचा पंतप्रधान, मृत्यू: ).
  • १९२२: डॉ. नारायण विष्णू / नानासाहेब धर्माधिकारी (महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव, मृत्यू: ).
  • १९३०: कोइंबताराव गोपीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू (मृत्यू: ).
  • १९३०: राम प्रसाद गोएंका (उद्योगपती, मृत्यू: ).
  • १९४२: रिचर्ड मायर्स (अमेरिकन सेनापती, मृत्यू: ).
  • १९४४: बुद्धदेव भट्टाचार्य (पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री, मृत्यू: ).
  • १९५०: शहीद इस्रार (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९५१: नितीश कुमार (प्रसिद्ध राजनीतिज्ञ तसेच पूर्व रेल्वे मंत्री व बिहारचे २२वे मुख्यमंत्री, मृत्यू: ).
  • १९५३: बंदुला वर्णपुरा (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९५८: वेन बी. फिलिप्स (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९६१: सज्जाद अकबर (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९६५: अर्चना जोगळेकर (अभिनेत्री, मृत्यू: ).
  • १९६८: कुंजराणी देवी (भारतीय महिला वेटलिफ्टर, मृत्यू: ).
  • १९६८: सलील अंकोला (भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९६८: संजीवा वीरासिंघे (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९६९: आझम खान (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९७१: अनिसुर रहमान (बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९७१: झहूर इलाही (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९८०: शहीद आफ्रिदी (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९८१: तिलन तुषारा (श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ).
  • १९८३: मेरी कोम (भारतीय महिला मुष्टियोद्धी, मृत्यू: ).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ११३१: स्टीवन दुसरा (हंगेरीचे राजा, जन्म: ).
  • १७९२: लिओपोल्ड दुसरे (पवित्र रोमन सम्राट, जन्म: ).
  • १९५५: नारायण सदाशिव मराठे / केवलानंद सरस्वती (महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक, जन्म: ).
  • १९८८: सोहन लाल द्विवेदी (हिंदीचे प्रसिद्ध कवी, जन्म: ).
  • १९८९: वसंतदादा पाटील (महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ, जन्म: ).
  • १९९१: एडविन लँड (अमेरिकन संशोधक, जन्म: ).
  • १९९४: मनमोहन देसाई (हिंदी फिल्म निर्माता व निर्देशक, जन्म: ).
  • १९९९: पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज / दत्तमहाराज कवीश्वर (वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक वेदांती, जन्म: ).
  • २००३: गौरी देशपांडे (मराठी लेखिका, जन्म: ).
  • २०१४: प्रफुल्ला डहाणूकर (चित्रकार, जन्म: ).
  • २०१७: तारक मेहता (लेखक, जन्म: ).
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.