मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

अक्कू बक्कू - मराठी कविता (इंदिरा संत)

प्रसिद्ध मराठी कवयित्री इंदिरा संत यांची अक्कू बक्कू ही मराठी कविता.
अक्कू बक्कू - मराठी कविता (इंदिरा संत)
अक्कू बक्कू - मराठी कविता (इंदिरा संत)

अक्कू बक्कू

आमच्या घरात मांजरे येतात
त्यांना छुत छुत करायचे नसते
अक्कू त्यांना फिस फिस करते
बक्कू पुढ्यात दूध ठेवते

आमच्या अंगणात चिमण्या कावळे
त्यांना हुश हुश करायचे नसते
अक्कू टोपलीत तांदूळ आणते
बक्कू मुठीने फेकत बसते

आमच्या फाटकात कुत्री येतात
त्यांना हड हड करायचे नसते
अक्कू त्यांना यू यू म्हणते
बक्कू भाकर आणून देते

आमच्या कुंपणाशी गायी येतात
त्यांना हैक हैक करायचे नसते
अक्कू त्यांना गोंजारत राहते
बक्कू आणून चारा देते

आमच्या कपाटात झुरळे दिसतात
त्यांना मात्र हाकलायचे असते
अक्कू झाडू आणून देते
बक्कू त्यांना पळवून लावते

- इंदिरा संत

संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.