मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

बाबा अन्‌ आई - मराठी कविता (कल्याण इनामदार)

प्रसिद्ध मराठी कवी कल्याण इनामदार यांची बाबा अन्‌ आई ही मराठी कविता.
बाबा अन्‌ आई - मराठी कविता (कल्याण इनामदार)
बाबा अन्‌ आई - मराठी कविता (कल्याण इनामदार)

बाबा अन्‌ आई

चिमणीला बोलले कावळोबा काळे
चिऊताई, आपली हुशारयत बाळे

खूप खूप त्यांना कळतंय जग
आपणच अडाणी राहिलोत बघ

नुसती कावकाव, चिवचिव करून
डोळ्यातलं पाणी ठेवलंय धरून

शेणाचं, मेणाचं घरपण जपत
सगळं आयुष्य काढलं खपत

माणसासारखा तुझ्याही मुलाने
कालच मोबाईल घेतलाय म्हणे

माझंही काळं उजळू लागलंय
संगणकावरती जाऊन आलंय

पंखात वारं भरलंय गडे
पिढीच्या पिढी गेलीय पुढे

कशाला आपण ओढायचे पाय?
घेतील भरारी खातील साय

तरण्याताठ्या चोचीला चिऊ
चांगले दिवस लागलेत येऊ

तरीही उगाच वाटतंय बाई
राहतील ना शब्द ‘बाबा अन्‌ आई’

- कल्याण इनामदार

संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.