मराठीमाती डॉट ऑर्ग संकेतस्थळाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे (मराठीमाती डॉट ऑर्ग ही मराठीमाती डॉट कॉम ची शाखा आहे).

३ मार्च चा इतिहास

जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ३ मार्च चा इतिहास पहा.
३ मार्च दिनविशेष | 3 March Dinvishesh
रंजना देशमुख
रंजना देशमुख - (१९५५ - ३ मार्च २०००) या एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री होत्या. १९७० - १९८० च्या दशकात अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा १९८० सालचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली हाच पुरस्कार त्यांच्या ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटासाठी मिळाला. ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, ‘चानी’ हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. १९८७ साली त्यांना झालेल्या अपघातामुळे त्यांची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. ‘फक्त एकदाच’ या मराठी नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले होते. २००० साली, मुंबई येथे हृदय बंद पडून त्यांचा मृत्यू झाला होता.

जागतिक दिवस

३ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • शहीद दिन: मलावी.
  • मुक्ति दिन: बल्गेरिया.
  • राष्ट्रीय सुरक्षा दिन.
  • जागतिक वन्यजीव दिन.

ठळक घटना (घडामोडी)

३ मार्च रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
  • १५७५: मुघल बादशाह अकबराने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले.
  • १८४५: फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.
  • १८७७: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.
  • १८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
  • १९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
  • १९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
  • १९३८: सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
  • १९३९: गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.
  • १९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
  • १९७१: भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली.
  • १९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.
  • १९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
  • २००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
  • २००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • २००९: स्टेट बैंक ऑफ इंडिया ने स्मार्ट यूनिट योजनेचा प्रारंभ केला
  • २०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

३ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८३९: जमशेदजी टाटा, भारतीय उद्योगपती, मृत्यू: ).
  • १८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक, मृत्यू: ).
  • १८८०: अचंत लक्ष्मीपति, आयुर्वेदिक औषधांच्या प्रचार-प्रसारासाठी प्रसिद्ध, मृत्यू: ).
  • १९०२: रामकृष्ण खत्री, भारताचे प्रमुख क्रांतिकारकांमधील एक, मृत्यू: ).
  • १९२०: मुकुंद शंकरराव किर्लोस्कर, किर्लोस्कर मासिकाचे संपादक, मृत्यू: ).
  • १९२३: प्रा. सदाशिव नथोबा आठवले, इतिहासकार आणि ललित लेखक, मृत्यू: ).
  • १९२६: रवि शंकर शर्मा उर्फ रवि, संगीतकार, मृत्यू: ).
  • १९२८: पुरुषोत्तम पाटील, कवी आणि लेखक, मृत्यू: ).
  • १९३९: एम. एल. जयसिंहा, भारतीय कसोटी क्रिकेटपटू, मृत्यू: ).
  • १९५५: जसपाल भट्टी, विनोदी अभिनेता, मृत्यू: ).
  • १९६७: शंकर महादेवन, गायक आणि संगीतकार, मृत्यू: ).
  • १९७६: राइफलमैन संजय कुमार, परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक, मृत्यू: ).
  • १९७७: अभिजित कुंटे, भारताचा चौथा ग्रँडमास्टर, मृत्यू: ).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

३ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १७०७: औरंगजेब (मोगल सम्राट, जन्म: ).
  • १९१९: हरी नारायण आपटे (कादंबरीकार, जन्म: ).
  • १९६५: अमिरबाई कर्नाटकी (जुन्या हिंदी चित्रपटाची प्रसिद्ध नटी, गायिका, पार्श्वगायिका तसेच ‘कन्नड कोकिळ’ म्हणून प्रसिद्ध, जन्म: ).
  • १९६७: स. गो. बर्वे (माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक, जन्म: ).
  • १९८२: रघुपती सहाय / फिराक गोरखपुरी (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर, जन्म: ).
  • १९९५: पं. निखील घोष (तबलावादक, जन्म: ).
  • २०००: रंजना देशमुख (मराठी चित्रपट अभिनेत्री, जन्म: ).
  • २००२: जी. एम. सी. बालायोगी (प्रसिद्ध राजनीतिज्ञ, पूर्व लोकसभा अध्यक्ष, जन्म: ).
  • २००९: यादवेंद्र शर्मा चंद्र (राजस्थानचे सर्वाधिक चर्चित व प्रसिद्ध उपन्यासकार, कथाकार तसेच नाटककार, जन्म: ).
  • २०१५: डॉ. राष्ट्रबंधु (बाल साहित्याचे प्रसिद्ध साहित्यकार, जन्म: ).
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!

तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.