जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ४ मार्च चा इतिहास पहा.
आयएनएस विक्रांत जहाज (१९६१)
आयएनएस विक्रांत जहाज - आय.एन.एस विक्रांत (४ मार्च १९६१ - ३१ जानेवारी १९९७) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. हे जहाज सप्टेंबर २२, १९४५ रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४ इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. ३१ जानेवारी १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.
१४६१: वॉर ऑफ द रोझेस, एडवर्ड चौथ्याने इंग्लंडचा राजा हेन्री सहाव्याला पदच्युत केले.
१७८९: न्यूयॉर्क शहरात अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेचे संविधान अमलात आल्याचे जाहीर केले.
१८३७: शिकागो शहराची स्थापना.
१८६१: अब्राहम लिंकन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१८९४: चीनच्या शांघाय शहरात लागलेल्या प्रचंड आगीत १,००० इमारती भस्मसात.
१९०२: शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-ए ची स्थापना.
१९२१: असहयोग आंदोलनात ननकाना येथील एका गुरुद्वारामध्ये जिथे शांतीपूर्ण सभेचे आयोजन केले जात होते परंतु सैनिकांच्या गोळीबारामुळे ७० लोकांचा मृत्यू झाला.
१९३०: दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन.
१९५१: प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
१९६१: भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
जन्म (वाढदिवस, जयंती)
४ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
टिप्पणी पोस्ट करा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.