जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक ५ मार्च चा इतिहास पहा.
नानासाहेब चाफेकर - (५ ऑगस्ट १८६९ - ५ मार्च १९६८) मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१०४६: पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.
१५५८: फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
१६६६: छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
१८५१: जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
१९३१: महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करार करार झाला.
१९६६: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
१९९७: भारत आणि तेरा इतर देशांनी मिळून इंडियन ओशन रिम एसोसियेशन संघाची घोषणा केली
१९९७: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
१९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
१९९८: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
२०००: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
२००८: महाराष्ट्राचे राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
२००८: भारताने समुद्रावरुन जमिनीवर हल्ला करणारे 'ब्रह्मोस' मिसाइलचे सफल परीक्षण केले.
२०१७: भारताची सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या महिला कर्मचार्यांनी अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एअर इंडियाच्या संपूर्ण महिला चालक दल असलेल्या विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम नोंदवला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
१९१०: श्रीपाद वामन काळे, संपादक.
१९१३:गंगूबाई हनगळ, किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका.
१९१६:बिजू पटनायक, ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी.
१९२५: वसंत साठे, पाचवी, सहावी, सातवी आठवी व नववी लोकसभेचे सदस्य.
१९३४:सोम ठाकुर, मुक्तक, ब्रजभाषेचे छंद आणि बेमिसाल लोक गीतांचे वरिष्ठ आणि लोकप्रिय रचनाकार.
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
टिप्पणी पोस्ट करा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.